पिंपरी – ज्येष्ठ नागरिकाकडून कार खरेदी करून त्या कारचे पैसे न देता सुमारे साडे तीन लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजन दत्तात्रय पाटील (वय-60 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून उमेश राजाराम गायकवाड (वय-35 रा. कात्रज) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन व उमेश यांच्यात कार खरेदी-विक्रीचा 15 जानेवारी रोजी भूमकर चौक येथे व्यवहार झाला होता.
उमेश याने राजन यांची मारुती सुझुकी डिजायर (एमएच 14 सीएक्स 9263) ही कार नेली. परंतु कार ही परत दिली नाही आणि व्यवहारात ठरलेले 3 लाख 50 हजार रुपये देखील दिले नाहीत. गुन्हा दाखल करुन हिंजवडी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.