कामशेत : आयुब शेख यांच्या खुनातील मुख्य आरोपी अटकेत

कामशेत – ताजे येथील आयुब याकुब शेख याचा पिंपळोली गावाच्या हद्दीत जीवे मारण्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून मित्रानेच मंगळवारी (दि. 2) रात्री खून केला होता. कामशेत पोलिसांनी मंगळवारी (दि. 2) पाच आरोपींना अटक केली होती. यातील फरार मुख्य आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि. 8) दुपारी अटक केली आहे.

ताजे येथील अयुब शेख याच्या खुनातील मुख्य आरोपी खंडू भगवान कुटे (वय 23, रा. ताजे) यास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, पोलीस हवालदार घोलप, महेश दौंडकर यांनी सोमवारी तळेगाव येथून दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास सापळा रचून अटक केली आहे.

आयुब शेख यांच्या हत्येनंतर या घटनेतील आरोपी अविनाश उर्फ लालू भगवान कुटे, बाबाजी सावळाराम केदारी, प्रकाश बबन चिंचवडे, योगेश सुरेश केदारी, सुरज नवनाथ काटे (सर्व रा. ताजे) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी नवनाथ उर्फ बॅटरी अंकुश केदारी यास शुक्रवारी (दि. 5) अटक केली, तर मुख्य आरोपी खंडू भगवान कुटे यास पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी पोलिसांनी अल्पावधीतच जेरबंद केल्याने पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्‍त केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.