पिंपरी : सोनसाखळी चोरांचा शहरात धुमाकूळ

पिंपरी – पिंपळे गुरव व वाकड परिसरात सोनसाखळीच्या एकाच दिवसांत तीन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी शहरात धुमाकूळ घातला असताना त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी पार्वतीबेन परभुभाई मिस्त्री (वय-63 रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून दुचाकीवरील दोन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वतीबेन या फेरफटका मारण्यासाठी रात्री आठच्या सुमारास बाहेर पडल्या असता, त्यांच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या तझयांनी पार्वतीबेन यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाचे व 87 हजार रुपयांच्या किमतीचे सोने हिसकावून नेले. सदरचे दोन तरुण हे 20 ते 25 वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते, असे पार्वतीबेन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस ठाणे येथे प्रमीला नागेश सिद्धा (वय 39, रा. कस्पटे वस्ती) यांनी फिर्याद दिली. प्रमिला या घराबाहेर शतपावली करत असताना दुचाकीवरूल आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. 3 तोळ्याची सोन्याची चैन व 2 तोळ्याचे मंगळसूत्र असा एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याचे प्रमीला यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तर वैशाली बळीराम मोरे (वय-55) या ही पायी फिरत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले मात्र मंगळसूत्र तुटल्याने चोरट्यांच्या हाती अर्धेच मंगळसूत्र लागले. 9 ग्रॅम सोने या घटनेत चोरीला गेले. या तीन घटनांमध्ये एकूण 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.