पिंपरी -भंगार मालाच्या गोडाऊनची भिंत फोडून तीन चोरटयांनी पाऊण लाखाची रोकड लंपास केली. शुक्रवारी (दि.5) पहाटे अडीचच्या सुमारास पिंपरीतील जय भवानी स्क्रॅप सेंटरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दौलत दिवाराम चौधरी (वय 35,रा.इंदिरानगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार कुलदीप युवराजसिंग जून्नी (वय 19, रा.शिवाजीनगर), आकाश गौड (वय 20), सुरज टाक (वय 19, दोघे रा. भाटनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चौधरी यांचे पिंपरी पुलाखाली जय भवानी नावाचे भंगार मालाचे गोडाऊन आहे. आरोपींनी शुक्रवारी पहाटे गोडाऊनची भिंत फोडून 81 हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला.