#Crime : कोंढवा पोलिसांकडून सराईत वाहन चोर जेरबंद

पुणे – कोंढवा पोलिसांनी सराईत वाहन चोरास जेरबंद करुन सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहारूख राजु पठाण (24 रा.बेलकर वस्ती, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कोंढवा पोलीस ठाणेच्या तपास पथकातील पोलीस नाईक अमीत साळुंखे व जोतिबा पवार यांना खबर मिळाली की मोटर वाहन चोरी रेकॉर्ड वरील आरोपी चोरीची मोटर सायकल घेवून कोंढवा येथे येत आहे. त्यानूसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, हवालदार रमेश गरुड, पोलीस अंमलदार अमित साळुंखे, संजीव कळंबे, निलेश वनवे,सुदाम वावरे, जोतिबा पवार,किशोर वळे,लक्ष्मण होळकर,अभिजीत रत्नपारखी यांनी शिवनेरीनगर येथे सापळा रचला. त्यांना तेथे शहारूख गाडी घेऊन येताना दिसला. त्याला लागलीच ताब्यात घेतले असता, त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेल्या 2 इतर मोटर सायकली जप्त करुन एकूण 6 मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

जप्त केलेल्या पैकी 2 मोटर सायकली वाकड व फरासखाना येथून चोरलोल्या आहेत. ह्या आरोपीने गजानन लहु मोरे (रा.मांजरी) यास विकल्याचे निष्पण झाल्याने त्या दोन गुन्हयात (रिसीव्हरला) अटक करण्या बाबत संबंधित पोलिस ठाण्यास रिपोटेँ पाठविला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.