पुणे – मुलाच्या लग्नासाठी दादरहून पुणे असा एसटीने प्रवास करणार्या महिलेला गुंगीचा पेढा खाण्यास देऊन नंतर तिच्याकडील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल अडीच लाखांचा ऐवज चोरून नेणार्या अनोळखी महिलेवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंगामध्ये काळ्या रंगाचा कुर्ता व काळ्या रंगाची सलवार परिधान केलेलया 40 ते 45 वर्षीय महिलेवर मुंबई सायन येथील महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 एप्रिल रोजी घडला.
28 एप्रिल रोजी फिर्यादी महिला आपल्या मुलाच्या लग्नासाठी एसटीने पुण्यात येत असताना. तिच्या सोबत आरोपी महिला प्रवास करत होती. याच दरम्यान आरोपी महिलेनी फिर्यादीची सर्व माहिती काढून घेत. तिला पुण्यात कशाला चालला आहात इथपर्यंत विचारणा करून आपल्या गोड बोलून विश्वासात घेतले. आरोपी महिलेनी तिच्या बरोबर आणलेला पेढा फिर्यादीला खायला दिला. यानंतर फिर्यादी महिलेला गुंगी येवून तिीच जीभ जड होत असल्याने दोघेही पुणे स्टेशन येथे उतरल्या. तेव्हा आरोपी महिला फिर्यादीला ससून हॉस्पीटल येथील गेटवर घेऊन गेली.
तेथे फिर्यादीला तुमचा एक्सरे काढयचा आहे, अशी बतावणी मारून तिच्या जवळील सर्व सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 50 किंमतीचा ऐवज तिच्याजवळ काढून घेत बॅगेसह चोरून नेला.