पणजी – मंगळसूत्र म्हणजे कुत्र्याच्या असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापिकेवर गुन्हा नोंदवण्यात आला. समाज माध्यमांवर शिल्पा सिंह या साळगांवरकर विधी महाविद्यालयातील प्राध्यापिकेने हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.
राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनीचे राजीव झा यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. शिल्पा सुरेंद्र प्रताप सिंह या नावाने फेसबुक प्रोफाईल असणाऱ्या महिलेने धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हे वादग्रस्त विधान केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
सिंह यांनी झा वारंवार धमक्या देत असल्याची फिर्यादही नोंदवली आहे. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्राध्यापिकेला कामावरून काढून टाकण्यीा मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे केली. मात्र यात अभाविपचा काहीही संबंध नसल्याचे सांगत कोणताही प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली.
सिंह यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा भादंवीच्या कलम 295 ए नुसार दाखल करण्यात आला. तर धमक्या दिल्याबद्दल झा विरोधात कलम 504, 506 आणि 509 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तर अन्य एक पोस्ट लिहून या माझ्या विचारांमुळे कोणत्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील त्या बद्दल मी माफी मागत असल्याचे सांगितले. मात्र आपल्या विचारांचे त्यात त्यांनी ठामपणे समर्थन केले आहे.