नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्याच्या कारणावरून मारहाण

 

निमोणे- नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्यावरून एकाला मारहाण झाल्याची शिरुर तालुक्यातील निमोणे येथे घटना घडली आहे. बाळासाहेब रावसाहेब काळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी जयश्री बाळासाहेब काळे (वय ३०)रा.पिंपळाचीवाडी निमोणे ता.शिरूर यांनी खबर दिली आहे.याप्रकरणी संजय राजाराम काळे,धनजंय शहाजी काळे,संभाजी येधू काळे या तिघांवर भादवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार दि.११ अॉगस्ट रोजी बाळासाहेब काळे हे आपल्या शेतातील गट नंबर ४७१ मधील नारळाचे झाडाचे आळ्यावर दगड ठेवत होते.यावेळी धनंजय काळे याने हातात दगड घेत बाळासाहेब यांच्या डोक्यात मारत दुखापत केली.त्याचबरोबर त्याच्या बरोबर असलेल्या सर्वांनी शिवीगाळ दमदाटी करत हाताने व लाथाबुक्यानी मारहाण केली व लाकूड कोयत्याने हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.