विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा

नगर –विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कान्हू सुंबे व इतर 25-30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 21) दुपारी न्यू आर्टस महाविद्यालयासमोरील हुतात्मा स्मारक येथे सदर आंदोलन करण्यात आले होते.

मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने हुतात्मा स्मारक येथे रविवारी दुपारी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश असतानाही शासकीय आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना आंदोलन केले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली. त्यावरून ऍड. गवळी व इतरांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.