अत्याचारप्रकरणी सांगलीच्या पोलिसाविरोधात गुन्हा  

महिला पोलिसाची तक्रार; लग्नाच्या आमिषाने अत्याचार व 50 हजाराची फसवणूक
सातारा –
पोलिस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल सुभाष पवार (वय 27, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

तक्रारदार महिला पोलिस सध्या सातारा परिसरात राहत असून, शाहूपुरी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिसावरच फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार युवती (22 वर्षाची) आहे. ती सध्या पोलिस म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार पोलिस युवतीची व अनिल पवार हे नात्यातीलच असल्याने त्यांच्याशी तिची ओळख आहे.

या ओळखीतूनच संशयित पवार याने पोलिस युवतीवर जबरदस्तीने सांगली व सातारा येथे अत्याचार केला. यानंतर संशयिताने तिला “तुझ्याशी लग्न करतो,’ असे वचन दिले. यातून संशयिताने पोलिस युवतीकडून दोघांना घर बांधण्यासाठी म्हणून 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर युवती राहत असलेल्या साताऱ्यातील तिच्या घरी संशयिताने तिच्यावर जबदस्तीने अत्याचार केला होता. त्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर पोलिस युवतीने अनिल पवार याला लग्नाबाबत विचारल्यानंतर त्याने नकार दिला. संशयिताला पैसे मागितले असता, त्याने पैसे देण्यासही नकार देऊन पोलिस युवतीला दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण केली.

दरम्यान, संशयित अनिल पवार या पोलिसाच्या कुटुंबीयांनीही पोलिस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली आहे. अत्याचार व फसवणूक झाल्याचे कळताच युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. ही सर्व घटना 17 जुलै 2018 ते 14 जून 2019 या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अनिल पवार याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास महिला उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)