रांजणगाव गणपती -येथील औद्योगिक वसाहतीमध्ये गाडी रस्त्यात अडवून शिवीगाळ करून दमदाटी करुन भंगाराचा ठेका तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम वाबळे व अन्य तिघेजण (पूर्ण नाव व पत्ते माहिती नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अभिजित शिंदे यांनी फिर्याद दिली.
सोमवारी (दि. 31) सकाळी अभिजित शिंदे व त्यांचा स्टाफ कंपनीच्या जात असताना आरोपी शुभम वाबळे याने त्याच्या 3 साथीदारांसह खंडणी मागितली.