पुणे (प्रभात वृत्तसेवा) – विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणात पती, सासु-सासऱ्यासह चौघांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेने ऍड. साजिद शहा यांच्यामार्फत पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती हा पीडितेच्या चरित्र्यावर संशय घेत असत. त्याच्यासह घरचे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. घर बांधण्यासाठी माहेरहुन पाच लाख रुपये आणण्यासाठी तिला तगादा लावण्यात येत असत.
तिला आणि तिच्या मुलांना गॅस सिलेंडरचा पाईप काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत असत. एकुणच, वेळोवेळी विविध कारणावरून शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याविषयी ऍड. साजिद शहा म्हणाले, याबाबत तिलेल्या तक्रारीनुसार भरतीय दंड 498 (विवाहितेचा छळ करणे), 323 (मारहाण) आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.