गेल्या तीन वर्षांत सीबीआयकडून 4123 सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे

नवी दिल्ली – गेल्या तीन वर्षांत सीबीआयने भ्रष्टाचार विरोधी कलामांतर्गत 4123 सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती कार्मिक विभागाचे मंत्री जितेंद्रसिंह यांनी संसदेत एका लेख उत्तरात दिली. त्यांनी म्हटले आहे की सन 2016 पासून सन 2018 पर्यंतच्या तीन वर्षांच्या काळात एकूण 4123 सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात 1767 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यापैकी 900 प्रकरणात प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. 59 प्रकरणात खाते अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 89 प्रकरणे चौकशीनंतर बंद करण्यात आली आहेत. न्यायालयात जी नऊशे प्रकरणे दाखल करण्यात आली त्यापैकी 19 प्रकरणांमध्ये संबधीतांना शिक्षा झाली असून नऊ प्रकरणातील आरोपी निर्दोष सोडण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चार खटले रद्द बातल ठरवण्यात आले आहेत असेही मंत्र्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी विविध उपाययोजना केंद्र सरकारी पातळीवर सुरू असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)