पिंपरी -कंपनीत लाऊड स्पीकर लावून गोंधळ घालणाऱ्या 17 जणांवर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार तळवडे येथील श्री टूल्स अँड स्टम्पिंग कंपनीत घडला.
प्रशांत वासुदेव बोंडे (वय 43, रा. मोशी), रजनीश रामलखन त्रिपाठी (वय 34, रा. चिखली), मिलिंद रामचंद्र नाफळे (वय 32, रा. चिखली), ज्ञानेश्वर भीमाशंकर कोलते (वय 35, रा. येलवाडी), सारंग मेघशाम कोल्हे (वय 28, रा. मोशी), अमित विनायक चौधरी (वय 28, रा. आकुर्डी), दीपक रामहृदय शुक्ला (वय 28, रा. चिखली), अकबर शेख (वय 30, रा. तळवडे), जयदेव मारुती चोपकर (वय 34, रा. मोशी), संतोष वामन पाटील (वय 30, रा. चिखली), दीपक बाबा देशमुख (वय 40, रा. तळवडे), नारायण दिनकर जूनघरे (वय 33, रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.