#Crime : गजा मारणेचा साथीदार रुपेशवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रस्त्यात केक कापून वाढदिवस करणं पडले महागात

पुणे : गजा मारणे आणी त्याच्या साथीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. गजा मारणे आणी त्याच्या साथीदारांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत आहेत. त्याचा जवळचा साथीदार रुपेश मारणे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. 

रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी त्याच्यावर जमाबंदी आदेशाचा भंग, बेकायदेशीर गर्दी जमा करणे आणी कोविडच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन करणे अशी कलमे लावण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 14 फेब्रुवारी रोजी बीट मार्शल सचिन जाधव व बालाजी शिंदे हे रात्रगस्तीदरम्यान सोमवार पेठ पोलीस चौकीजवळ आले होते. तेव्हा त्यांना पोलीस शिपाई सुमीत खुट्टे व सुभाष मोरे भेटले. दरम्यान सचिन जाधव वॉशरुमला गेले असताना त्यांना धनराज गिरी हायस्कूलच्या बाजूने एक तरुण घाबरुन धावत येताना दिसला.

त्याने माहिती दिली की गुंड रुपेश मारणे हा साथीदारांसह केक कापत होता. मी तेथून येत असताना, त्याने मला बाय बघतोस माझ्याकडे मी रुपेशदादा मारणे पुण्याचा भाई असून जेलमधून सुटून आलो आहे. तुला पण केकसारखे कापून टाकीन असा दम दिली. यामुळे चौघेही पोलीस कर्मचारी तेथे गेले असता मारणे हा त्याच्या साथीदारांसह तेथून पळून गेला.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक उल्हास कदम आले असता, त्यांना माहिती देण्यात आली. सर्वांनी मारणे व त्याच्या साथीदारांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.