#SLvIND : चहल व गौतम यांनाही करोनाची बाधा

कोलंबो – श्रीलंका दौऱ्यावर असलेले भारतीय क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम यांनाही करोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आल्याने बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला करोना झाला हे तीन दिवसांपूर्वी समोर आले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आठ खेळाडूंना विलगीकरणात पाठवण्यात आले होते. आता खेळाडूंच्या केलेल्या चाचणीत चहल आणि गौतम यांनाही बाधा झाल्याचे आढळले आहे.

पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, गौतम, मनीष पांडे, इशान किशन व चहल हे कृणालच्या संपर्कात आले होते.

या खेळाडूंशिवाय भारतीय संघ शुक्रवारी मायदेशी परतला असून बाकी खेळाडूंना विलगीकरणाचा कालावधी संपल्यावर चाचणी घेऊन त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच भारतात परत येणार आहे. शनिवारीही चाचणी होणार असून जे खेळाडू पॉझिटिव्ह असतील त्यांना 10 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.