Sagarika Ghatge | बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. राज घराण्यातील अभिनेत्री सागरिकाने भारतीय क्रिकेटपटूसोबत लग्न केलं होतं. पण 5 वर्षांच्या ब्रेकनंतर आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ललाट’ असे आहे. नुकतेच तिने शूटिंग सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात तिचा पूर्णपपणे लुक बदलण्यात आला आहे. ज्यात तिला ओळखणेही कठीण झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या पात्राचे नाव भगवती असे असून यामध्ये ती एका गावातील मुलीच्या भूमिकेत दिसते आहे.
या भूमिकेविषयी पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, ‘माझा नवा चित्रपट ‘ललाट’चा लूक प्रदर्शित होताना मला चिंता आणि उत्साह दोन्ही एकत्रितपणे जाणवते आहे. काही काळासाठी दूर राहिल्यानंतर हा एक आव्हानात्मक पण समाधानकारक प्रवास आहे. मला जे आवडते ते पुन्हा करणे सोपे नव्हते, परंतु मी अशा पात्रासह पुनरागमन करतेय, याबद्दल मी खूप आभारी आहे. यापूर्वी केलेल्या कोणत्याही पात्रापेक्षा हे खूप वेगळे आहे’.
View this post on Instagram
सागरिका पुढे लिहिते की, ‘या पटकथेने, पात्रानेच मला चित्रपट जगतात परत आणले, जे मला आवडते आणि मी गमावले होते. प्रत्येक क्षण खूप खास होता आणि मला आशा आहे की मी हे करत राहीन आणि खरोखरच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथांचा मी एक भाग बनेन’.’ सागरिकाच्या या पोस्टनंतर तिला चाहत्यांसह कलाकारांनी आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Sagarika Ghatge |
View this post on Instagram
सागरिका ही भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी आहे. सागरिका गेल्या काही काळापासून सिनेविश्वापासून दूर आहे. २०२० मध्ये ती शेवटचे ‘फूटफेरी’ या टेलिव्हिजन फिल्ममध्ये दिसली होती. सागरिकाचे ‘चक दे इंडिया’, ‘फॅशन’, ‘शादी के बाद’, आणि ‘गोलमाल’ हे चित्रपच विशेष गाजले. मराठीमध्ये तिने ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटात काम केले आहे. आता जवळपास ५ वर्षांनी सागरिका मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. Sagarika Ghatge |