जम्मू-काश्‍मीरमध्ये रैनाची अकादमी

जम्मू – भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सुरेश रैना जम्मू-काश्‍मीरमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करत आहे. राज्यातील गुणवत्तेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत आगामी काळात भारतीय संघासाठी सेकंड बेंच तयार व्हावा यासाठी ही अकादमी कार्यरत राहणार असल्याचे रैनाने सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर रैना भविष्यात काय करणार याबाबत गेले काही दिवस सातत्याने चर्चा होत होती. या अकादमीबाबत खुद्द रैनानेच त्याच्या ट्‌विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील गुणवत्तेला समोर आणण्यासाठीच तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचेही रैनाने सांगितले. जम्मू-काश्‍मीरच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचा निर्णय रैनाने घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.