नवी दिल्ली – मॅचफिक्सिंगच्या आरोपातून क्लीन चिट मिळालेला भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत याला अखेर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत लिलावासाठी निश्चित केलेल्या खेळाडूंत स्थान मिळाले आहे.
गेल्या वर्षी त्याला न्यायालयाने या आरोपांतून क्लीन चिट दिल्यानंतरही त्याला आयपीएल स्पर्धेत खेळता आले नव्हते. यंदा मात्र, त्याने पहिल्याच यादीत नाव नोंदवले होते व बीसीसीआयनेही अंतिम यादी जाहीर करताना त्यात श्रीशांतचेही नाव असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे त्याला यंदाच्या मोसमात स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी मिळाली असून त्याची लिलावातील बेसप्राईज 75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.