सिमला – भारताचे मुख्य क्रिकेट प्रशिक्षक राहुल द्रविड हे 12 मे ते 15 मे दरम्यान धर्मशाला येथे होणाऱ्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. भाजपचे धर्मशाला मतदार संघाचे आमदार विशाल नेहरिया यांनी सोमवारी ही माहिती दिली.
अधिवेशनात देशभरातून तब्बल 139 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नेहरिया म्हणाले की, द्रविडच्या उपस्थितीमुळे तरुणांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा संदेश जाईल. त्यामुळे त्यांना मुद्दाम या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हिमाचलप्रदेशात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे.
या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भाजयुमोच्या या अधिवेशनाला विशेष महत्व आहे. तेथील राहुल द्रविड यांच्या उपस्थितीने त्यांच्या राजकारणातील सक्रिय सहभागाविषयीही चर्चा सुरू झाली आहे.