लखनौ – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँच्या वादग्रस्त प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उत्तर प्रदेशमधील अमरोह मध्ये हसीनने मोहम्मद शमीच्या घरी जाऊन गोंधळ घातला आहे, त्यामुळे मोहम्मद शमीच्या आईने याबाबत पोलीस तक्रार केली असून, हसीन जहाँला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
हसीन जहाँला पोलिसांनी अमरोहाच्या जिल्हा रुग्णालयात नजरकैदेत ठेवले असून, मोहम्मद शमीची ओळख आणि पैशामुळेच पोलीस आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप हसीन जहाँने केला आहे.
दरम्यान, शमीच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसा आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप करताना पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. आतापर्यंत शमीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले होते. मोहम्मद शमी भावाच्या मेहुणीसोबत ईद झाल्यानंतर लग्न करणार आहे आणि याच कारणामुळे शमी घटस्फोट देणार असल्याचा खळबळजनक आरोप हसीन जहाँने केला होता.