क्रिकेटपटू इरफान पठाणचे लवकरच डेब्यू

भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आता अभिनय क्षेत्रातही आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार आहे. इरफान हा एका तमिळ चित्रपटातून आपली कारकीर्द सुरू करत आहे.

इरफानच्या 36व्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करत त्याच्या फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी देण्यात आली. या पोस्टरमध्ये इरफानचा लूक खूपच जबरदस्त दिसत आहे.

“कोब्रा’ असे या तमिळ चित्रपटाचे नाव असून यात इरफान पठाण हा असलान यिलमाजची भूमिका साकारत आहे. यात तो एक फ्रेंच इंटरपोल अधिकारी म्हणून काम करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तमिळ सुपरस्टार चियान विक्रम मुख्य भूमिका साकारत आहे.

चियान विक्रम हा एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारणार असून यात तो बहुरंगी लुक्‍समध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून तो लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

यात केएस रवी कुमार, श्रीनिधी शेट्टी आदी कलाकारही निर्णायक भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाबाबत इरफानच्या चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.