नवी दिल्ली – करोनाचा संसर्ग आता क्रिकेटमध्येही वाढत असल्याचे दिसून येत आहे. रणजीपटू लक्ष्मीरतन शुक्ला पाठोपाठ आता माजी कसोटी क्रिकेटपटू व उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांनाही करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी व स्कॉटलंडचा माजीद हक व शुक्ला यांच्यानंतर आता चौहानही करोनाबाधित झाल्याने आता क्रिकेटमध्येही करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे. चौहान हे खासदार असून त्यांच्या संपर्कात आता कोण कोण आले होते, याची सध्या माहिती घेतली जात असून त्यांच्या कुटुंबीयांचीही करोना चाचणी करण्यात आली असून त्याचाही अहवाल लवकरच मिळणार आहे.