बंगळुरू – कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये (केपीएल) मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट चर्चेत आले आहे. सट्टेबाजांशी संपर्क केल्याने एका स्थानिक क्रिकेटपटूला अटक करण्यात आली आहे. निशांत सिंह शेखावत असे अटक केलेल्या खेळाडूचे नाव आहे.
आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या केपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी स्थानिक क्रिकेटपटूला अटक करण्यात आली आहे. याआधी केपीएलशी जोडल्या गेलेल्या एका संघाच्या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली होती. क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. निशांत सिंह शेखावत सट्टेबाजांच्या संपर्कात होता. त्याने बंगळुरू ब्लास्टर्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसाद यांच्याशीही संपर्क केला होता.