7 वी कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धा
पुणे – स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 7व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत टेक महिंद्रा, वेंकीज् , एम्प्टोरीज व सेल2 वर्ड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत अमित बांदेकरच्या अषटपैलू कामगिरीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने गालाघर संघाचा 5 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना गालाघर संघाने 9 षटकात 4 बाद 82 केल्या. 82 धावांचे लक्ष वैभव राजुरकरच्या 38 व अमित बांदेकरच्या 31 धावांसह टेक महिंद्रा संघाने 8.1 षटकात 3 बाद 83 धावांसह पुर्ण करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अमित बांदेकर सामनावीर ठरला.
दुसऱ्या लढतीत सुजीत उबाळेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर वेंकीज् संघाने सॉफ्टहार्ड संघाचा 8 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड संघाने 9 षटकात 7 बाद 37 धावा केल्या. 37 धावांचे लक्ष विपुल खैरेच्या 30 धावांसह वेंकीज् संघाने केवळ 3.2 षटकात बिनबाद 40 धावा करून सहज पुर्ण करत उपांत्य फेरी गाठली. 20 धावांत 4 गडी बाद करणारा सुजीत उबाळे सामनावीर ठरला.
अन्य लढतीत रत्नदीप लोंढेच्या दमदार 68 धावांसह एम्प्टोरीज संघाने युनियन बॅंक ऑफ इंडिया संघाचा 14 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला तर सेल2 वर्ड संघाने फुजित्सु संघाचा 5 गडी राखून दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.