पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक : पीवायसी संघाचे सामन्यावर वर्चस्व

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात दिव्यांग हिंगणेकर (नाबाद 111 धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघापुढे 281 धावांचे आव्हान उभे केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 40 षटकात 8 बाद 281 धावा केल्या. पण पीवायसीचे 8 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 241 (वजा 40 धावा)झाली. यात दिव्यांग हिंगणेकरने अफलातून फलंदाजी करत 119 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 111 धावांची खेळी केली.

सलामीचा फलंदाज अभिषेक परमार 33 धावांवर बाद झाल्यानंतर दिव्यांग हिंगणेकर (111 धावा) याने मंदार भंडारी (45 धावा) च्या साथीत चौथ्या गडयासाठी 150 चेंडूत 114 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर अमेय भावे 17, आदित्य लोंढे 15, करण जाधव 13, योगेश चव्हाण 10 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत पीवायसी संघाला 241 धावांचे आव्हान उभे करून दिले.

डेक्कनकडून धीरज फतंगरेने 77 धावात 2 गडी, श्‍लोक धर्माधिकारीने 50धावात 2 गडी, तर मुकेश चौधरी (42-1), प्रखर अगरवाल (55-1) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाने आजदिवस अखेर 21 षटकात 3 बाद 130 धावा केल्या. यात सलामीचे फलंदाज अभिषेक ताटेने 39 चेंडूत 38 धावा व यश बोरामनीने 35 चेंडूत 27 धावा केल्या.

अभिषेक व यश यांनी पहिल्या गडयासाठी 68 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. डेक्कनचे स्वप्निल फुलपगारे नाबाद 20 धावा व, धीरज फतंगरे नाबाद 18 धावांवर खेळत आहे. डेक्कन जिमखाना संघाचा अजून 19षटकांचा खेळ अजून बाकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.