नांदेड सिटी वॉरियर्सची विजयी सलामी

आंतर जस क्रिकेट अकादमी करंडक क्रिकेट स्पर्धा

पुणे – जस क्रिकेट अकादमी तर्फे आयोजित आंतर जस क्रिकेट अकादमी करंडक क्रिकेट स्पर्धा धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर पार पडत आहेत. या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत रितेश साप्ताळे (27 धावा व 2-8) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नांदेड सिटी वॉरियर्स संघाने धानोरी चॅम्प्स अ संघाचा 13 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.

प्रथम फलंदाजी करताना पारती फडणीस 31, आदित्य चौरा 22, रितेश साप्ताळे 27 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर नांदेड सिटी वॉरियर्सने 15 षटकांत 3 बाद 94 धावा केल्या. प्रत्युत्तरात धानोरी चॅम्प्स अ संघाला 15 षटकांत 8 बाद 81 धावांपर्यंतच मजल मारता आली. यात पार्थ हेडगिरे 23, शॉन खांदवे 17, यथार्थ जगदाळे 16 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. नांदेड सिटी वॉरियर्सकडून रितेश साप्ताळे (2-8), सुचेत लाडे (2-3) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

दुसऱ्या सामन्यात विहान नायर याने केलेल्या 38 धावांच्या खेळीच्या जोरावर अमनोरा रॉयल्स ब संघाने धानोरी चॅम्प्स ब संघाचा 6 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.