पिंपरी -पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ऍकेडमी आयोजित 12 वर्षांखालील मुलांच्या व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धेस सुरुवात झाली असून 25 षटकांच्या सामन्यात स्पोटर्स पार्क ऍकेडमी संघाने विजय मिळविला. स्पोर्टस पार्क ऍकेडमी आणि विराग क्रिकेट ऍकेडमी यांच्यात झालेल्या लढतीत स्पोटर्स पार्कने दोन गडी राखत सहज विजय संपादन केला.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना स्पोटर्स पार्कच्या सलामीला आलेल्या साहिल पारख याने नाबाद 10 आणि दिनानाथ रडे याने नाबाद 14 धावा करून आपल्या संघाला सहजच विजय मिळवून दिला. 10 अतिरिक्त धावांसह 34 धावांचा हा डाव केवळ 1.3 षटकांत संपुष्टात आला. सर्व गडी राखत स्पोर्टस पार्कने विजय मिळविला. दोन बळी घेत 10 धावा करणारा साहिल पारख सामनावीर ठरला.