#Cricket | महिला संघाचा सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा

नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघ यावर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

हा दौरा जानेवारीमध्ये होणार होता, परंतु करोनाच्या धोक्‍यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता. तसेच या दौऱ्यापूर्वी भारताचा महिला संघ इंग्लंडविरुद्धही मालिका खेळणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ 16 जूनपासून ब्रिस्टल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.

कसोटी व एकदिवसीय मालिका –मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक) झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.

टी-20 संघ –हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हार्लिन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.