पूना क्‍लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून

पुणे – पूना क्‍लबच्या वतीने पूना क्‍लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्‍लब येथे दिनांक 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे यंदा 6 वे वर्ष आहे. क्‍लबमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंची लिलावाद्वारे विभागणी करण्यात आली आहे. 16 वर्षाखालील हर्षवर्धन पाटील या खेळाडूला लिलावात पृथ्वी लायन्स संघाने 4 हजार 300 रुपये अशी सर्वाधिक बोली लावून संघात घेतले. तर, 40 वर्षावरील जमीर शेख या खेळाडूला मेहता सेलर्स संघाने 3 हजार 700 रुपये तसेच खुल्या विभागात रोहित जाशव या खेळाडूला हार्मोनी टायगर्स संघाने 7 हजार 200 रुपये अशी सर्वाधिक बोली लावून संघात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक संघात 12 ते 14 खेळाडू असणार आहेत. यातील 9 खेळाडू मैदानात असतील. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरी स्वरुपात होणार आहे. प्रत्येक सामना 6 षटकांचा असणार आहे. स्पर्धेत बारा संघ सहभागी होणार असून, या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)