लिंकन (न्यूझीलंड) : भारतीय वरिष्ठ संघात पदार्पणाची संधी साधत असलेल्या पृथ्वी शाॅ याने झळकावलेल्या १५० धावांच्या जोरावर भारत अ संघाने न्यूझीलंड-११ विरूध्दच्या सराव सामन्यात १२ धावांनी विजय मिळवला आहे. अशी कामगिरी करत त्याने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी न्यूझीलंड दौ-यासाठी संघ निवडीची प्रक्रिया अंतिम टप्यात असताना शाॅ ने दाखवलेल्या कामगिरीकडे निवड समितीला दुर्लक्ष करू चालणार नाही.
⭐ 150 runs
⭐ 100 balls
⭐ 22 fours
⭐ 2 sixesWhat a performance by Prithvi Shaw in India A's win over New Zealand XI in the second 50-over game 👏 pic.twitter.com/QAqdaZqdt4
— ICC (@ICC) January 19, 2020
भारत अ संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४९.२ षटकांत सर्वबाद ३७२ धावा केल्या होत्या. यात २० वर्षीय पृथ्वीने १०० चेंडूत २२ चौकार व २ षटकारांसह १५० धावांची खेळी केली तर विजय शंकरने ४१ चेंडूत ५८ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड-११ संघाला ६ बाद ३६० धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून जॅक बाॅयेलचने १३० तर फिन अॅलनने ८७ धावांची खेळी केली पण ते संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. भारताकडून गोलंदाजीत इशान पोरेल आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी २ गडी बाद केले.