पुणे – कर्मा 9 स्पोर्ट्स तर्फे व रेडबुल यांच्या सहकार्याने आयोजित कर्मा 9 टी-20 कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत स्पायडर स्पोर्ट्सने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय नोंदविला.
लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे आठवड्याच्या शेवटी दर शनिवार व रविवार या दिवशी सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सागर मापूस्कर (नाबाद 56) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्पायडर स्पोर्ट्सने टायटन्स संघाचा 57 धावांनी पराभव करत विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात शशी बाहीरने (2-22 व 13 धावा) केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जीबीजी-गुड, बॅड अँड गुगली संघाने अयोध्या वॉरियर्स संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
साखळी फेरी:
अयोध्या वॉरियर्स : 20 षटकात 9 बाद 132 धावा (गिरीश कोंडे 37, प्रणव नातू 33, शंतनू गांधी 11, बादल बैद्य 2-21, शशी बाहीर 2-22, हरीश केआर 1-17)पराभूत वि. जीबीजी-गुड, बॅड अँड गुगली: 18.5 षटकात 6 बाद 135 धावा (मातंग सुर्ती नाबाद 45, हरीश केआर 24, शशी बाहीर 13, रणजीत करथा 10, सचिन कांगरकर 3-7, अमित उमरीकर 2-43);सामनावीर-शशी बाहीर.
स्पायडर स्पोर्टस : 20 षटकात 4 बाद 148 धावा (चांदेर कांत ठाकूर 54, सागर मापूस्कर नाबाद 56, मिकदाद सय्यद 13, पंकज गोपलानी 1-22, विजय धर्मानी 1-23)वि.वि.टायटन्स: 19.5 षटकात 9 बाद 91धावा (प्रकाश करिया 26, राहुल शर्मा 16, पंकज गोपलानी 14, रोहन पिसाळ 3-10, समीर सिंग 2-17, धीरज द्विवेदी 2-25);सामनावीर-सागर मापूस्कर.