मुंबई – भारताचा युवा क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर लवकरत लग्नबंधनात अडकणार आहे. शार्दूलचा नुकताच मुंबईत साखरपुडा पार पडला. शार्दूलने त्याची गर्लफ्रेंड मित्ताली परुळकर सोबत साखरपुडा उरकला असून त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या BKC येथील हॉलमध्ये शार्दूल ठाकूरच्या साखरपुडा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. मुळचा पालघरचा शार्दूल आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघाकडून खेळतो. आपल्या सुरेख कामगिरीमुळे शार्दुलने भारतीय संघात देखील स्थान मिळवलं आहे.
शार्दूरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐन मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला मालिका जिंकण्यात यश आलं होतं. शार्दूलने अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात आपलं स्थान निर्माण केलं आहे.