एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग स्पर्धेस सुरूवात

पुणे – डिव्हाईन स्टार तर्फे चौथ्या “एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग (डब्ल्युपीएल)’ अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन ही स्पर्धा व्हिजन क्रिकेट ऍकॅडमी मैदानावर होत आहे.

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 4 निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. गेले तीन वर्ष डिव्हाईन स्टार तर्फे महिलांसाठीची ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आणि या वर्षी स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत ऑक्‍सिरिच स्मॅशर्स, पीएमपी ग्रुप, एचपी ड्रिम वन आणि ऍडोर मारव्हलस्‌ या चार संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या संघांची आणि खेळाडूंची निवड लिलावाने करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here