सीबीएलएल, टेक महिंद्रा संघांचे विजय

प्रथम व्हिन्टेज आय-टी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – सीबीएसएल, टेक महिंद्रा या संघांनी प्रथम व्हिन्टेज आय-टी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. नेहरू स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत विप्रोविरुद्ध सीबीएसएल संघाला प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 110 धावाच करता आल्या. यात अतिफने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. विप्रोकडून विशाल हिरगुडेने तीन गडी बाद केले. यानंतर सीबीएसएलच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून विप्रोचा डाव 16.5 षटकांत 86 धावांतच गुंडाळला. विप्रोकडून कृणाल सोलंकीने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. सीबीएसएलकडून महेंदरने 3 गडी बाद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या लढतीत टेक महिंद्रा संघाने सिनरझिप संघावर 27 धावांनी मात केली. टेक महिंद्रा संघाने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 163 धावा केल्या. यात अमितोष निखारने 53 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सिनरझिप संघाला 136 धावाच करता आल्या. स्पर्धेचे उद्घाटन इंडियन बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सौरभकुमार सिंग, प्रथम स्पोर्टसचे चेअरमन अमित जगताप, संचालक भाऊसाहेब डांगे, सुजय निकम यांच्या उपस्थितीत झाले.

संक्षिप्त धावफलक :

1) सीबीएसएल 20 षटकांत 7 बाद 110 (अतिफ 31, प्रसाद जैस्वाल 24, विशाल हिरगुडे 3-20, सुशांत सिन्हा 1-20) वि. वि. विप्रो 16.5 षटकांत सर्वबाद 86 (कृणाल सोलंकी 43, सनी भारद्वाज 16, महेंदर 3-24, केतन घाडगे 2-22, आकाश अहीर 2-5).

2) टेक महिंद्रा 20 षटकांत 2 बाद 163 (अमितोष निखार नाबाद 74, रजत भट्टलवार 37, प्रतीक दुबे नाबाद 34, शैलेश तुरिया 1-27, राहुल पंडिता 1-25) वि. वि. सिनेरझिप 20 षटकांत सर्वबाद 136 (आशिष गोखले 35, संदीप कांबळे 20, मनीष चौधरी 4-27, सचिन कुलकर्णी 2-30).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)