एलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय

प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे  -एलटीआय, झेन्सर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.

नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत एलटीआय संघाने सीबीएसएल संघावर 57 धावांनी मात केली. यात एलटीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 210 धावा केल्या. एलटीआय संघाकडून सलामीवीर सिद्धार्थ ठाकूरने 57 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 78, तर सुमीत पांडाने 30 चेंडूंत 49 आणि आयुष अवस्थीने 31 चेंडूंत 41 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सीबीएसएल संघाला 5 बाद 144 धावाच करता आल्या. यात अभिषेक खंबाटेचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने 35 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारसह 60 धावा केल्या.

यानंतर दुसऱ्या लढतीत सिद्धार्थ जलनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर झेन्सर संघाने एचएसबीसी संघावर पाच गडी राखून मात केली. झेन्सर संघाने एचएसबीसी संघाला 6 बाद 136 धावांत रोखण्यात यश मिळवले. यात सिद्धार्थने तीन गडी बाद केले. यानंतर झेन्सर संघाने विजयी लक्ष्य 19.1 षटकांत 5 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात सिद्धार्थने 33 चेंडूंत 6 चौकारांसह नाबाद 45 धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.