सायबेज, मर्क्‍स, टीसीएस, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे -सायबेज, मर्क्‍स, टीसीएस व सॉफ्टहार्ड ऑटोमेशन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018- 19 स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पुना क्‍लब क्रिकेट मौदानावर झालेल्या उप-उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौरभ रावलच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सायबेज संघाने ऍमडॉक्‍स्‌ संघाचा 7 गडी राखून पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना ऍमडॉक्‍स्‌ संघाने 20 षटकात 7 बाद 131 धावा केल्या. 131 धावांचे लक्ष संकेत एकलच्या नाबाद 47 व सौरभ रावलच्या 30 धावांसह सायबेज संघाने केवळ 17.3 षटकात 3 बाद 132 धावांसह पुर्ण केले.

सौरभ रावल सामनावीर ठरला. तर, दुसऱ्या लढतीत वैभव महाडीकच्या जलद 76 धावांसह मर्क्‍स संघाने आयबीएम संघाचा 39 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात राहुल गर्गच्या नाबाद 81 धावांच्या बळावर टीसीएस संघाने ऍटॉस्‌ संघाचा 32 धावांनी पराभव केला.

या सामन्यात केवळ 22 चेंडूत नाबाद 81 धावा करणारा राहुल गर्ग सामनावीर ठरला. तर, अन्य एका लढतीत विक्रांत बांगरच्या झंजावती 93 धावांच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने कॅपजेमिनी संघाचा 33 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)