कोलंबो : पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक व दक्षिण आर्फिकेते मिकी आर्थर हे लवकरच श्रीलंका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. श्रीलंका क्रिकेट संघाने आर्थर यांच्याशी दोन वर्षाचा करार केला आहे.
श्रीलंकेच्या सहायक वर्गात त्यांच्यासह ग्रँड फ्लाॅवर आणि डेव्हिड सेकर यांचाही समावेश आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फ्लाॅवर हे श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक असतील, तर सेकर हे गोलंदाजीचे प्रशिक्षक असणार आहेत. श्रीलंकेचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरूसिंघा आहेत. आॅस्ट्रेलियाच्या शेन मैकडर्मोट यांना याआधीच संघाचे नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
५१ वर्षीय आर्थर यांनी याआधी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली आहे. आर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका संघ या महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे.
दरम्यान, मे २०१९ मध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी खराब झाली होती. पाकिस्तानच्या टीमला सेमी फायनलही गाठता आली नव्हती. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षक मिकी आर्थर आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला घरचा रस्ता दाखवला होता.