आशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात 5 बदल

दुबई – आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील भारत वि. अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचा नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात पाच बदल करण्यात आलेले आहेत. धवन आणि रोहितच्या जागी केएल राहुल आणि मनीष पांडे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांना आराम देण्यात आला आहे. त्यांच्याजागी दीपक चाहर, सिध्दार्थ कौल आणि खलील अहमद यांना संधी मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सामन्यासह दिपक चाहर एकदिवसीय कारकिर्दिस सुरूवात करीत आहे. तर रोहित शर्माच्या एेवजी महेंद्र सिंग धोऩी हा आज कर्णधार पद सांभाळणार आहे. कर्णधार म्हणून आजचा त्याचा हा 200 वा सामना असणार आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ पुढील प्रमाणे –  लोकेश राहुल, अंबाति रायुडू, मनीष पांडे, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, केदार जाधव, रविंद्र जडेजा, दीपक चहर, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, खलील अहमद.

आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ पुढील प्रमाणे –  मोहम्मद शह्ज़ाद, जावेद अहमदी, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, असग़र अफगान, नजीबुल्लाह ज़ादरान, मोहम्मद नबी, राशिद ख़ान, गुल्बदिन नाएब, आफ़ताब आलम, मुजीब उर रहमान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)