स्टेडियम क्रिकेट कप अजिंक्यपद स्पर्धा
पुणे, दि. 10 – वडकी वॉरीयर्स, ए.के. स्पोर्टस्, मेट्रो क्रिकेट ऍकॅडमी आणि स्टेडियम क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे होत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद’ स्पर्धेत आगेकूच केली.
स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात प्रणित मुळीक याने केलेल्या 39 धावांच्या जोरावर ए.के. स्पोर्टस् संघाने परब क्रिकेट ऍकॅडमी संघाचा 2 गडी राखून पराभव केला. याच गटाच्या दुसर्या सामन्यात माधव शेरके याने केलेल्या 48 धावांच्या जोरावर वडकी वॉरीयर्स संघाने पुना लायन्स् संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. पुना लायन्स् संघाने केलेल्या 132 धावांचा पाठलाग वडकी वॉरीयर्सने 15.4 षटकात आणि 1 गडी गमावून केला.
16 वर्षाखालील गटाच्या सामन्यात चरक पोळेकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्टेडियम क्रिकेट क्लबने वडकी वॉरीयर्सचा 23 धावांनी सहज पराभव केला. स्टेडियम संघाने 23 षटकात 9 गडी गमावून 117 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वडकी वॉरीयर्सचा डाव 19.4 षटकात 94 धावांवर आटोपला. चरण पोळेकर (4-18) आणि यश तुंगे (4-23) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
12 वर्षाखालील गटाच्या सामन्यात इमॅन्युअल सिन्डो याच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर मेट्रो क्रिकेट क्लबने रमणबाग इलेव्हनचा 7 गडी राखून पराभव केला. रमणबाग संघाच्या 129 धावांचे लक्ष मेट्रो क्रिकेट क्लबने 23.4 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. इमॅन्युअल आणि प्रखर मेहरठा (नाबाद 30) यांनी चौथ्या गड्यासाठी 125 चेंडूत 123 धावांची भागिदारी करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
14 वर्षाखालील गट :
परब क्रिकेट ऍकॅडमी ः 25 षटकांत 7 बाद 128 (पियुष कुटे 26, प्रितम परब 23, देवांग गरूड 3-18, आयुष मोरे 2-23) पराभूत वि. ए.के. स्पोर्टसः 25 षटकांत 8 बाद 129 (प्रणित मुळीक 39, पियुष वानखेडे नाबाद 15, प्रितम परब 3-15) सामनावीरः प्रणित मुळीक.
2) पुना लायन्स ः 29 षटकांत 5 बाद 132 (हमझा शेख 39, अर्थव एकबोटे 15, रोहीत चौधरी 1-18, रोहीत कोंढरे 1-21) पराभूत वि. वडकी वॉरीयर्स ः 15.4 षटकांत 1 बाद 134 (माधव शेरके 48, श्रेयश साळुंखे नाबाद 43) सामनावीरः माधव शेरके;
16 वर्षाखालील गट :
स्टेडियम क्रिकेट क्लब ः 23 षटकांत 9 बाद 117 (प्रेम गव्हाणे 18, अर्थव कुलकर्णी 16, अर्थव सुमंत 12, आदित्य आंदळे 3-24, गणेश पटेल 2-7, ओंकार चौधरी 2-28) वि.वि. वडकी वॉरीयर्स ः 19.4 षटकांत सर्वबाद 94 (अन्श खरावत 28, चरण पोळेकर 4-18, यश तुंगे 4-23); सामनावीरः चरण पोळेकर;
12 वर्षाखालील गट :
रमणबाग इलेव्हन ः 28 षटकांत सर्वबाद 129 (सिध्देश लालबेगी 19, यश रणावरा 18, देवांग पटेल 3-29) पराभूत वि. मेट्रो क्रिकेट क्लबः 23.4 षटकांत 3 बाद 130 (इमॅन्युअल सिन्डो नाबाद 49, प्रखर मेहरठा नाबाद 30, प्रथमेश पोतनिस 3-15); सामनावीरः इमॅन्युअल सिन्डो