ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक लँगर यांच्यावर अतिरिक्त जबादारी

सिडनी: ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना संघ निवडीमध्ये अधिक स्वायत्त देण्यात आले. निवडसमितीतील सदस्य मार्क वॉ यांच्या राजीनाम्यानंतर संघ निवडीमध्ये त्यांना जास्त महत्व देण्यात येणार आहे. या समितीमध्ये आता फक्त ट्रीवोर होहन्स, ग्रेग चॉपल आणि लँगर आहेत.

लँगर हे ट्वेंटी२० पॅनेलचे मुख्य निवडकर्ता असतील तर अन्य सदस्य त्यांना सहकार्य करतील. होहन्स हे कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या निवड समितीचे मुख्य असतील आणि त्यांना चॉपल आणि लँगर यांच्याशी सल्लामसलत करावी लागेल. ऑस्ट्रेलियन निवडसमितीच्या स्वरूपात मागील काही वर्षात सतत बदल झाले आहेत, एकावेळी ही पाच सदस्यीय समिती होती.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कामगिरी विभागाचे मुख्य पॅट हॉवर्ड म्हणाले ” आगामी काळात ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर २०२० मध्ये होत असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने लँगर यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी वाढली आहे. ते राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता असतील.”  चेंडू छेडछाड प्रकरणी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना १२ महिन्यांच्या बंदीनंतर लँगर यांची ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)