विषाणू मारणाऱ्या फिल्टरची निर्मिती

ह्युस्टन – विषाणूंना पकडून नष्ट करू शकणाऱ्या फिल्टरची निर्मिती संशोधकांनी केली आहे. करोना विषाणूला हे मास्क नष्ट करू शकतील, असा दावाही संशोधकांनी केला आहे. यामुळे अगदी दाटीवाटीने वावरावे लागणाऱ्या शाळा, हॉस्पिटल आणि आरोग्यकेंद्रांमधील संभाव्य संसर्गाला रोखणे शक्‍य होणार आहे.

“जर्नल मटेरियल्स टुडे फिजीक्‍स’ या विज्ञानविषयक नियतकालिकमध्ये या संबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या फिल्टरच्या संपर्कात आलेल्या विषाणूंपैकी 99.8 टक्के करोना विषाणूंचा नायनाट करू शकतील, असा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

या फिल्टरची निर्मिती उच्च प्रतीच्या रिकेट फोमला 200 अंश सेल्सियसपर्यंत तापवून केली गेली असून या फिल्टरच्या संपर्कात आल्यास अँथ्य्राक्‍स रोगाला कारणीभूत होणाऱ्य बॅसिलस अँथ्य्रासिस या घातक जीवाणूलाही 99.9 टक्‍क्‍यांपर्यंत नष्ट करू शकतो.

हा फिल्टर विमानतळ, विमाने, इमारतींमधील कार्यालये, शाळा आणि प्रवासी जहाजांमध्येही वापरला जाऊ शकतो, असे ह्युस्टन विद्यापिठातील या लेखाचे सहलेखक झिफेंग रेन यांनी म्हटले आहे.

या डिव्हाइससाठी डेस्क-टॉप मॉडेलही विकसित केले जात आहे. ते कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या आसपासच्या भागात हवा शुद्ध करण्यास सक्षम असेल, असे संशोधकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.