करोनाचा नायनाट करणारा मास्क तयार; प. बंगालमधील मुलीचा दावा

कोलकाता – प. बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातल्या दिगांतिका बोस या मुलीने करोनाचा नायनाट करणारा मास्क शोधला असल्याचा दावा करण्यात आला आहे. किल द करोना व्हायरस हे नाव तिने या मास्कला दिले आहे.

या मास्कला तीन चेंबर्स आहेत. पहिल्या चेंबरमध्ये निगेटीय आयन तयार होतात, त्यामुळं हवेतली धूळ दूर करून श्वास घेताना स्वच्छ हवा मिळू शकते. ही स्वच्छ हवा दुसऱ्या चेंबरमधून जाते. तिसरा चेंबर केमिकल चेंबर असून त्यामध्ये साबण आणि पाण्याचा वापर केलेला आहे. या चेंबरमधलं पाणी आणि साबणाचं मिश्रणच करोनाचा कर्दनकाळ ठरतं असं दिगांतिका म्हणते.

साबणाचं पाणी करोनाला मारून टाकतं हे आपणा साऱ्यांना माहितीय. त्यामुळं पहिल्या दोन चेंबरमधल्या फिल्टर मधून जरी करोना पुढे गेला तरी तिसऱ्या चेंबरमधलं हे साबणाचं पाणी करोनाला नाकात जाण्यापूर्वीच नष्ट करेल असा दिगांतिकाचा दावा आहे. साबणाच्या पाण्याने पुनःपुन्हा हात धुवत राहा असं डॉक्‍टर आणि वैज्ञानिक पहिल्यापासून सांगत आहेत. त्याच सूत्राचा वापर करून हा मास्क बनवला आहे.

करोनाबाधित व्यक्‍तीने हा मास्क घातला तर त्याच्या उच्छ्वासातून म्हणजेच नाकातून बाहेर पडणाऱ्या हवेतला करोना तिसऱ्या चेंबरमध्ये म्हणजेच नाकापासून पहिल्याच चेंबरमध्ये तो संपून जाईल आणि करोनाचा फैलाव वाढणार नाही असं दिगांतिकाला वाटतं. दिगांतिकानं पश्‍चिम बंगालच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून या मास्कचा प्रयोग केला जावा अशी मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.