तिवरे धरण फोडल्याची खेकड्यांनी दिली कबुली?

पुणे – चिपळूणमधले तिवरे धरण फुटल्याने २३ जण वाहून गेले त्यापैकी १८ मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. अशात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे अजब तर्क मांडला आहे. खेकड्यांनी भोके पाडल्याने जे भगदाड पडले त्यामुळेच तिवरे धरण फुटले, असा अजब दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. यामुळे सोशल मीडियावर जलसंधारणमंत्र्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. सध्या फेसबुकवर ब्रेकिंग न्यूज म्हणून एक चांगलीच व्हायरल झाली आहे.

काय आहे पोस्ट 
जलसंधारण-जलसंपदा मंत्री यांच्या आदेशावरून एका खेकड्यास अटक  
धरण फोडल्याची व जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा केल्याची खेकड्यांनी दिली कबुली. आत्ताच आलेल्या बातमीनुसार एका खेकड्याला अटक झाली आहे. पुढील तपास सुरू आहे. लवकरच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होईल. बाकी खेकडे भीती पोटी फरार, अशी हास्यास्पद पोस्ट चांगलीच ट्रेंड होत आहे.

दरम्यान, तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.