जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांची सीपीआरला भेट

कोल्हापूर  –  जिल्ह्यात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याचे समजल्यावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काल रात्री तातडीने सीपीआर मध्ये भेट देऊन माहिती घेतली.जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मिळाल्याचे समजल्यानंतर काल रात्री शासकीय रुग्णालयात भेट देऊन एक वाजेपर्यंत संबंधित डॉक्टर्स व अधिकारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन माहिती घेतली.

बाधित रुग्णाच्या परिवारातील सदस्यांचेही स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्वांची रुग्णालयात वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश श्री. यड्रावकर यांनी दिले. संबंधित बाधित रुग्णाला ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना उपस्थित डॉक्टर्स अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील, रुग्णालयाचे डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.