परिंचे – येथील सटलवाडी परिसरात चोरलेल्या गायीसह तीन चोरट्यांना वडगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. चोरलेल्या पंधरा गायींचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
युवराज कोळघर (रा. वाघळवाडी, ता. बारामती) यांच्या गोठ्यातून 57 हजार रुपये किमतीची संकरित गाय चोरीला गेल्याची तक्रार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गायी चोरट्यांचा शोध लावला. शुभम जाधव, सुहास जाधव (रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती) व पोपट गुळुंबे (रा. सटलवाडी (परिंचे), अशी चोरट्यांची नावे आहेत.