जुन्नर – येथे बेकायदेशीररीत्या प्रतिबंध असलेल्या गोवंश जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गफार जब्बार कुरेशी (रा. माई मोहल्ला) असे आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक सागर हिले यांनी फिर्याद दिली आहे. जुन्नर शहरातील माई मोहल्ला येथे गफार कुरेशी याने त्याच्या राहत्या घरात बेकायदेशीररीत्या गोवंश जनावराची कत्तल करून
हे मांस कोणतीही सुरक्षितता न पाळता एकत्रित ठेवून रोगाचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केल्याचे आढळून आले असल्याने गफार कुरेशी विरोधा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रसंगी 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.