तेरा जणांवर गुन्हा दाखल
फलटण – जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या गाडीस अडवल्या कारणातून धुळदेव (ता. फलटण) गावाच्या हद्दीत गोरक्षकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी कोळकी येथील एकासह 12 ते 13 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी ही घटना घडली असून यातील तक्रारदार गोरक्षक अमोल जाधव व शरद गाडे (रा. मलटण) यांना एक संशयित गाडी दिली दिसली.
त्यांनी गाडी थांबवली असता गाडीतून तीन कालवडींचे हातपाय बांधून गाडीत डांबून नेण्यात येत असल्याचे समोर आले. याबाबत जाधव व गाडे विचारणा करत असताना पिकअप गाडी व स्वीफ्ट कारमधून आलेल्या अमीर मेहबूब मुलाणी (रा. कोळकी, ता. फलटण) याने ओमनी चालकास तू जा यांना मी बघतो असे म्हणत कमरेचे पिस्टल काढले व अमोल जाधव यांच्या डोक्यास लावून गाडी का अडवलीस अशी विचारणा केली.
त्याच वेळी इनायत कुरेशी, हुसेन बालाजी कुरेशी, वाहिद याकूब कुरेशी, अरबाज इम्तियाज कुरेशी हे तिथे आले आहे त्यांनी लोखंडी गज, हॉकी स्टिकने जाधव यांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी शरद गाडे जाधव यांना सोडवण्यासाठी जात असताना दुसऱ्या एका गाडीतून आलेल्या व्यापारी सद्दाम शैकत हाता कोयता घेवून आला.
या सर्वांनी अमोल जाधव यांना हातातील हत्यारांसह लाथाबुक्यांनी मारहाण सुरु केली. परिसरातील लोक घटना पाहून जमा होवू लागले. त्यावेळी सौरव सुनील सोनावले नावाचा युवक तिथे आला त्यांनी भांडणे सोडवली तेव्हा मारहाण करणारे पळून गेले. या घटनेत अमोल जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत शरद गाडे यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी 12 ते 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप यातील कोणाला अटक झालेली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.