केंद्र सरकारने बनवलेले कोविन अॅप धीम्या गतीने सुरू – आरोग्यमंत्री टोपे

मुंबई –  राज्यात मंगळवारपर्यंत 54 टक्के लसीकरण झाले असून लसीकरण प्रक्रीया वेगाने सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांना दिली.

मंत्री टोप पुढे म्हणाले, केंद्र सरकारने बनवलेले कोविन अॅप धीम्या गतीने सुरू आहे व अनेक लोकांचे नाव हे पुन्हा(डब्बल) जात असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. याबाबत दुरूस्ती करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला वारंवार विनंती केली आहे.

त्यासोबतच हेल्थ वर्कर्समध्ये असलेली वॅक्सिन संदर्भातील भीती घालवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत असून वॅक्सिनबाबत समाजात संभ्रम पसरेल असे विधान कोणीही करू नये, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्य देशात लसीकरणासाठी पहिल्या यादीत आहे. राज्य सरकार ऑफलाइन लसीकरण देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र अॅप दुरूस्त झाल्यास या कामाला गती येईल, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.