Coronavirus India: सलग दुसऱ्या दिवशी 9 हजार हून अधिक प्रकरणे; 396 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा करोनाने जोर पकडला असून यादरम्यान मृतांचा आकडाही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे 9 हजार 119 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच 24 तासात देशभरात 396 लोकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.

याशिवाय 10 हजार 264 जण करोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आता एकूण 1,09,940 सक्रिय रुग्ण आहेत, जे 539 दिवसांनंतरचे सर्वात कमी आहे.

दरम्यान,  जगभरात करोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढले असून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.